इंडीयन नेव्हीमध्ये निवड झाल्याने दोन युवकांचा सत्कार

सावरवाड धनगरवाडी, कलंबिस्त दुर्गावाडी येथील युवकांचा समावेश

⚡सावंतवाडी ता.१४-: सावरवाड धनगरवाडी येथील संदीप बरागडे व कलंबिस्त दुर्गावाडी येथील सिद्धेश पास्ते हे दोघेही इंडियन नेव्ही मध्ये भरती झाले त्याबद्दल त्यांचा सह्याद्री फाउंडेशन व सावरवाड ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा यांच्यावतीने भेटवस्तू शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सावरवाड प्राथमिक शाळेत हा सत्कार कार्यक्रम झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर सह्याद्री फाउंडेशनचे माजी सचिव तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत सरपंच सुप्रिया मडगावकर उपसरपंच तेजस्विनी कुडतरकर महेंद्र दळवी नयना लाड मुख्याध्यापिका रश्मी नाईक शिक्षिका अदिती चव्हाण अनिल मेस्त्री. दाजी कुडतरकर निर्मला कुडतरकर अनिता काळे पूर्वा नाईक सौ मोर ज कर सौ पाटील मनस्वी पवार गुरुनाथ वर्धम विठ्ठल बरागडे सौ बरागडे आधी उपस्थित होते.

यावेळी इंडियन नेव्ही मध्ये नियुक्त झालेले संदीप बरागडे व कलंबिस त येथील सिद्धेश पास्ते व तबलावादन मध्ये या छायातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेला अर्जुन मेस्त्री यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन श्री मडगावकर व श्री सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

You cannot copy content of this page