सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेतर्फे जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सत्कार..
सावंतवाडी, ता. ८ : सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटनही संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संजू परब यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असल्याचे सांगितले. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. नाभिक संघटनेच्या सामाजिक कार्याला आपला कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास नाभिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, ओबीसी मोर्चा तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडीस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, राजू मुळीक, संदीप तळवणेकर आदी उपस्थित होते.
