महामार्गाने जाणाऱ्या एसटी सर्व्हीस रोड वरून न्या

सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर यांच्यासह नागरिकांची मागणी

⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे होण्यापूर्वी जे अधिकृत बस थांबे होते ते आता काही ठिकाणी उड्डाण पुल झाल्या मुळे हायवे च्या सर्व्हिस रोड ला गेले. या मुळे एसटी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चारशे ते पाचशे मीटर चालत जाऊन उभे राहावे लागत आहे. याचा त्रास जिल्ह्यातील प्रवाशाना होत आहे. तसेच त्या मुळे महामंडळाची प्रवाशी संख्या घटत आहे.

अनधिकृत व खाजगी प्रवाशी वाहतूक सर्व्हिस रोड ने होत असल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक देखील होत आहे. तरी या बाबत सिंधुदुर्ग विभागातील सर्व एसटी चालक, वाहक यांना सर्व्हिस रोड वरून एसटी नेण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर, निसार शेख, राकेश केसरकर यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page