Headlines

Global Maharashtra Breaking News

निलेश राणेंच्या आरोपानंतर देवगड तालुक्यात पहिली मोठी गांजा कारवाई

कोटकामतेत २३ झाडे जप्त४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; एकावर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा दाखल.. ⚡देवगड,ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गांजा लागवडीविरोधातील पहिली मोठी कारवाई करत देवगड पोलिसांनी कोटकामते येथील आडीवरेवाडीत धडक कारवाई करून ४९ हजार रुपये किमतीची २३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर…

Read Full News

दांडेलीच्या अनिशा ची महाराष्ट्र पोलीस दलात निवड…

जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अनिशाने, केलं आपलं स्वप्न साकार.. ⚡आरोस ता.३०-:दांडेली येथील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या एका शेतकरी मुलीने जिद्द , चिकाटी आणि कठोर मेहतीने आपलं पोलीस होण्यास स्वप्न साकार करून इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला. शेतकरी कुटुंबातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही अभिमानाची बाब आहे. दांडेली येथील अनिशा पालयेकर या…

Read Full News

देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार…

कणकवली : देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तहसीलदार रमेश पवार यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कामकाजाचे कौतुक करत प्रशासनातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. तसेच निवृत्तीनंतरच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी माजी जिल्हा…

Read Full News

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश; जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गती.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये नव्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली…

Read Full News

आडाळी एमआयडीसीतील अवैध उत्खनन व माती चोरीप्रकरणी दीपक केसरकर यांचा मोठा हात; त्यांची चौकशी लावा…

रुपेश राऊळ : चौकशी न झाल्यास जनआंदोलन उभारणार; निलेश राणे यांच्या आरोपांमुळे केसरकर मतदारसंघात अपयशी ठरल्याचे सिद्ध.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित खनिजयुक्त मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांचा सहभाग असू शकतो. मात्र, या प्रकरणामागे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर…

Read Full News

तिलारी घाटात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला…

खून की अपघात? पोलीस तपास सुरू… दोडामार्ग, : दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील तिलारी घाट परिसरात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, तिलारी घाटातून जाणाऱ्या काहीजणांना रस्त्यालगतच्या झुडपांमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी…

Read Full News

आडाळी एमआयडीसीतील कथित माती चोरी प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिले कारवाईचे आदेश…

⚡दोडामार्ग ता.३०-: आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या कथित खनिजयुक्त माती चोरी आणि बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेना शिष्टमंडळाने कठोर कारवाईची मागणी केली….

Read Full News

दारू, ड्रग्ज, गो-तस्करीपासून भ्रष्टाचारापर्यंत आरोपांची सरबत्ती…

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला..?”आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल.. ओरोस ता ३०सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जिल्ह्याचे मोठे…

Read Full News

मळगाव येथे ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन…

हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजता मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे मळगाव पंचक्रोशी भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी तसेच भावी पिढीपर्यंत…

Read Full News

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी…

⚡कणकवली ता.३०-: कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या गतिरोधकांची पाहणी करण्यात आली. याशिवाय परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचाही आढावा घेण्यात आला. यावेळी तेजस राणे,…

Read Full News

You cannot copy content of this page