हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.३०-: हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजता मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे मळगाव पंचक्रोशी भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी तसेच भावी पिढीपर्यंत संस्कार पोहोचावेत, या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून हिंदू संमेलन समन्वय समिती, मळगाव पंचक्रोशी यांच्यावतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार गणेशराव ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सावंतवाडी तालुका अध्यक्ष ह. भ. प. श्री लक्ष्मण तुकाराम कडव महाराज उपस्थित राहणार आहेत.
संमेलनानिमित्त सायंकाळी ४ वाजल्यापासून सुगम संगीत, पोवाडा, मर्दानी खेळ (लाठी–काठी) आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रमुख वक्ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांचे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. “एकत्र येऊ, जागृत होऊ आणि धर्मसंरक्षणासाठी कटिबद्ध होऊ” या संदेशासह हे संमेलन सर्व हिंदू बांधवांना एकत्र आणणारे ठरणार आहे. त्यामुळे समस्थ हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदू संमेलन समन्वय समिती, मळगाव पंचक्रोशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
