केसरकरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मिरवणुकीत सहभागी होत शिवसैनिकांनी दाखविली निष्ठा;घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि ढोलताशांच्या गजरात दुमदुमली सावंतवाडी ⚡सावंतवाडी ता.०१ प्रसन्न गोंदावळे-: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज निष्ठा दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांनी सावंतवाडी मतदार संघाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसेनेत समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.यावेळी शिवसेनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी चिटणीस…
