बांदा मराठा समाज गणेश आरास स्पर्धेत ७० जणांचा सहभाग

परेश कोचरेकर यांनी मिळविला प्रथम क्रमांक;मंदार सावंत द्वितीय तर नागेश सावंत आणि मच्छिंद्र गडकरी तृतीय विजेते

⚡बांदा ता.०९-: गणेशोत्सवनिमित्त बांदा मराठा समाजाच्या वतीने शहर मर्यादित आयोजित श्री गणेश आरास स्पर्धा २०२२ चा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. स्पर्धेत ७० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत परेश रमेश कोचरेकर यांनी प्रथम, मंदार चंद्रकांत सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. नागेश विठ्ठल सावंत व मच्छिन्द्र गडकरी यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. विष्णू वसकर व आनंद विष्णू वाळके यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आज पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी निकाल जाहिर केला.
यावेळी सचिव म. गो. सावंत, खजिनदार राकेश परब, सहसचिव राजेश सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, गुरुनाथ सावंत, दीपक सावंत, स्वप्नील सावंत, निलेश कदम, रत्नाकर आगलावे, शैलेश गवस, गुणेश गवस आदी उपस्थित होते.
लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण मंगेश सुहास माणगांवकर (होडावडे) व शिवा सोमा गावडे (इन्सुली) यांनी केले.

You cannot copy content of this page