⚡सावंतवाडी ता.०९-: दुसऱ्या महायुद्धानंतर जगात आर्थिक घडी बिघाड झाल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी राजवाडा येथे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तेथे आले असता जागतिक पातळीवर मंदी येण्याची शक्यता असून भारताने काय पावले उचलली आहेत असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता त्यावेळी सुरेश प्रभू बोलत होते. यावेळी युवराज लखमराजे भोसले, अँड नकुल पार्सेकर उपस्थित होते.
सुरेश प्रभू म्हणाले,जागतिक पातळीवर आयात निर्यात वाढत जाते. त्यावेळी आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार कमी व्हायला लागला की अस्तव्यवस्थेवर परिणाम होतो. युक्रेन युद्धामुळे उर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. दुष्काळात तेरावा महिना प्रमाणे युरोप अमेरिकेमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर विजेची मागणी वाढेल.विजेची मागणी वाढेल आणि पुरवठा कमी होईल. ऊर्जेची किंमत वाढल्यानंतर प्रोडक्शन कमी होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
