सिंधुदुर्गात साजरा होणार विशाल सप्ताह

भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;काय झाडी काय हॉटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची असणार खास उपस्थिती

⚡कुडाळ ता.०९-: युवा नेतृत्व विशाल परब यांचा अभिष्टचिंतन गौरव सोहळा होणार मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होणार आहे.या निमित्ताने विशाल सप्ताहाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले आहे.माजी खासदार निलेश राणे व काय झाडी?काय हाटेल फेम शहाजी बापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती अभिष्टचिंतन सोहळ्या दिवशी पंधरा आॅक्टोबरला असणार आहे.तर ह्या १५ ऑक्टोबर ला अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्यासह अनेक संगीतमय,पोवाडा,शाहीर कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.भाजपाचे युवा नेतृत्व व युवा उद्योजक श्री विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 15 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात व विविध शैक्षणिक आणि समाजपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे.

या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने विशाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या वाढदिवस सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळेस माजी नगराध्यक्ष संजू परब,कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे,बाळू देसाई,बाबली वायंगणकर यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना दादा साईल बोलताना म्हणाले 12 ऑक्टोंबर 2022 रात्रौ: ७:०० वाजता जिल्हास्तरीय विशाल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आकर्षण बॉडी बिल्डर प्रदर्शन मधुसूदन कालेलकर सभागृह,वेंगुर्ला येथे होणार आहे.13 ऑक्टोंबर 2022 रात्रौ 7 वाजता महा डबलबारी सामना
बुवा : श्री. गुंडू सावंत
विरुद्ध बुवा:श्री.संदीप लोके
स्थळ – ओवेस कॉम्प्लेक्स ,कट्टा कॉर्नर ,बांदा येथे होणार आहे..
14 ऑक्टोंबर 2022 सकाळी 9 वाजता महाआरोग्य शिबिर चष्मा वाटप कै. श्रावण धुरी यांच्या स्मरणार्थ केसरकर हॉल माणगाव, तिठा येथे होणार आहे.तर 14 ऑक्टोंबर 2022
शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप सावंतवाडी तालुक्यातील शाळांत होणार आहे.15 ऑक्टोंबर 2022 सायंकाळी 5 ते 7:३० वाजता
संगीतकार अजित कडकडे यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. रात्रो ७:३० ते 8:१५ युवा नेतृत्व विशाल जी परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे ८:१५ ते ८:३०
पांढरी काठी दिनानिमित्त
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा होणार आहे. ८:३० ते १०:०० वाजता
सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा होणार आहे. रात्रौ.१०:०० ते १२:०० सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाडा होणार आहे.15 ऑक्टोबर चे हे सर्व कार्यक्रम कुडाळ नवीन एसटी स्टँड जवळ होणार आहेत.तरी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्र मंडळ सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page