सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे प्रतिपादन
सावंतवाडी ता.०९-:
विद्यार्थ्यांनी आता प्राप्त केलेले यश हे अंतिम यश नाही तर यापुढे जाऊन बरेच मोठे यशोशिखर त्यांना गाठायचे आहे यासाठी भरपूर अभ्यास परिश्रम करण्याची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी भरपूर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाणजाधव यांनी केले
त्या सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव स्नेह मेळावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर माजी जिल्हाध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर एसबीआयचे जिल्हा प्रबंधक लक्ष्मण सरंबळकर पशु विस्तार अधिकारी डॉ.शरद जाधव सावंतवाडी पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण संघटना मार्गदर्शक बाबुराव चव्हाण जिल्हा सदस्य कल्याण कदम जिल्हा सदस्य सुषमा चव्हाण जिल्हा मार्गदर्शक विजय चव्हाण तसेचप्रमुख वक्ते करियर कोच अँड माईंड ट्रेनर चे सीईओ प्रा सूर्यकांत लोखंडे हे उपस्थित होते
या कार्यक्रमात प्रा सूर्यकांत लोखंडे यांनी स्पर्धा परीक्षेत करिअर कसे करायचेयाबाबतचे मार्गदर्शन केले ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्ता आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यास जिल्ह्यातूनही भविष्यात बडे अधिकारी निर्माण होतील एखाद्या विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता नसली तरी सुद्धा कोणतेही स्किल डेव्हलप करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की 35 टक्के गुण मिळवले तरी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात परंतु याकडे सकारात्मक पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी पणदूर हायस्कूल मधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी अथर्व दाभोलकर यांच्याकडून काही प्रयोग करून दाखवले यातून त्यांनी मेंदू तल्लख होण्यासाठी कोणकोणते व्यायाम करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले
यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी आपल्या समाजामध्ये बरेच जण मोठ मोठ्या मुद्द्यावर काम करत आहेत काहीजण निवृत्त ही झाले आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून समाज बांधवांनी आपली प्रगती साधावी असे आवाहन केले
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नेह मेळावा आणि विद्यार्थी गुणदर्शन सोहळा यशस्वी केल्याबद्दल सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी समाजबांधवांचे ऋण व्यक्त केले यावेळी त्यांची पत्नी सौ सुखदा
म्हापणकर हिचा वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बोलताना सावंतवाडी तालुका सचिव गुंडू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे व्हावे मोठ्या पदावर जाऊन समाजात नाव कमावले मात्र आपल्या समाजाला विसरू नये आपली जात अभिमानाने सांगावी असे आवाहन केले
यावेळी समाज बांधवांच्या गुणवंत विद्यार्थी डॉ यश पवार ओलंपियाड ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केलेली कु गिरिजा चव्हाण बारावी विज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण खुशी पवार दहावी परीक्षेत 95 टक्के गुण पटकावलेला केतन शिरोडकर तर बारावी परीक्षेत अजिंक्य दीप लवू चव्हाण यांनी 85% गुण पटकावून समाजामध्ये प्रथम क्रमांक पटकावला ऐश्वर्या वाडकर हिने वाणिज्य शाखेत 70 टक्के तर विज्ञान शाखेत श्रावणी सांगेलकर हिने बहात्तर टक्के गुण मिळवले.योगिता बेळगावकर नाट्य व चित्रपट कलाकार प्रतिभा चव्हाण यांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये पदोन्नती मिळवलेले कर्मचारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण जि प बांधकाम विभागात शाखा अभियंता विनायक चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका तृप्ती चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखाधिकारी लक्ष्मण आरोसकर भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी लक्ष्मण सरंबळकर आदींचा सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ नागरिक म्हणून 100 वर्षीय यशवंत वाडीकर यांचाही उन्नती मंडळातर्फे सन्मान करण्यात आला याचा स्वीकार ॲड अनिल निरवडेकर यांनी केला
यावेळी संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर माजी तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर माजी सचिव भारत बांदेकर जगदीश चव्हाण तसेच तालुका उपाध्यक्ष सुधाकर बांदेकर सदानंद चव्हाण अंकित चव्हाण सूर्यकांत सांगेलकर सचिव गुंडू चव्हाण खजिनदार दिपाली बांदेकर सहसचिव विजय ओटवणेकर राजकुमार चव्हाण प्रवीण साळगावकर संजय बांबुळकर दशरथ वाडकर रिया सांगेलकर संजना चव्हाण वैशाली चव्हाण संदीप बिबवणेकर विजया चव्हाण आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवर्धन आरोसकर नरेश कारिवडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम चव्हाण यांनी केले कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार होते परंतु कार्य बाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही
