श्री गणेश येशू मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

⚡मालवण ता.०९-: मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १९ वा वर्धापन दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सोहळा दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्र, दि.१५ रोजी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्री ८ वा. येशू पूजा (तेस), दि. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वा. काकड आरती, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश येशू मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष आतू फर्नांडिस, कार्याध्यक्ष दीपक कदम, उपाध्यक्ष बबन वाघ व मित्रमंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page