सेवांगण मालवण येथे हवामान बदल विषयावर कार्यशाळा

⚡मालवण ता.०९-: हवामान बदल या विषयावर बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दि. ११ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. युनिसेफ आणि सीईई या संस्थांतर्फे तसेच बॅ. नाथ पै सेवांगणच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ ते ३० वर्ष वयोगटातील युवकांना या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. युवकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन टीम संगमचे संजय वराडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page