अजगराला सुखरूप सोडले नैसर्गिक अधिवासात

ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांची कार्यतत्परता

⚡कणकवली ता.०९-: ओसरगाव माजी उपसरपंच आणि अडल्या नडल्याच्या अडचणीच्या काळात धावून जाणारं व्यक्तिमत्व बबली राणे यांनी मानवतावादाचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे.

ओसरगाव पटेलवाडी येथे गवळदेव नजीक एक महाकाय अजगर हायवे ओलांडताना बबली राणे यांच्या दृष्टीस पडला. रस्त्यावरून वाहने जात असल्यामुळे अजगराच्या जीवाला धोका होता. त्यामुळे बबली राणे यांनी लागलीच दोन्ही बाजूच्या गाड्या थांबवून सर्पमित्राच्या मदतीने अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याच काळात बबली राणे यांनी दाखवलेली ही तत्परता प्रेरणादायी आहे. हायवेवरून सरपटत जाणारा अजगर दृष्टीस पडतात बबली राणे यांनी सर्पमित्र रोहित राणे यांना बोलावले व त्यांनी मोठ्या शितापीने अजगराला पकडून त्या अजगराचा प्राण वाचला. नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यात तत्परतेने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी नागपंचमी दिवशी सर्पमित्रांचा कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते सत्कार केला होता. सापांचे संवर्धन व जतन करणे हा या सत्काराचा प्रमुख उद्देश होता. त्याप्रमाणे तेही कार्यरत आहेत. वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अजगराला मिळालेले हे जीवदान खास आहे. यावेळी अक्षय राणे, चेतन राणे, ओमकार राणे, सुरज कदम, प्रशांत रसाळ, स्वप्निल शिंदे, श्रीकृष्ण चव्हाण गावातील कर्तव्यदक्ष नागरिकांनी अजगराच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत केली.

You cannot copy content of this page