Headlines

Global Maharashtra Breaking News

पोईप येथे २६ रोजी तिरंगी भजन सामना

⚡मालवण ता.२१-: पोईप येथील देव वेताळ मंदिर येथे २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता तिरंगी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंजिवलीचे बुवा प्रवीण सुतार, डुंगो कमला भजन मंडळ, शेळपीचे बुवा दिनेश वागदेकर, लिंगेश्वर भजन मंडळ, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात हा सामना रंगणार आहे. भजन प्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,…

Read More

मालवणात ग्रा. पं. मतदार यादीबाबत १८ हरकती

⚡मालवण ता.२१-: डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक- निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मालवण तालुक्यात ग्रामपंचायतींनी जाहीर केलेल्या मतदार यादीबाबत नऊ ग्रामपंचायतींमधील १८ हरकती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये असरोंडी-१, नांदोस १, सुकळवाड १, कोळंब ६, हडी १, वायंगणी ५. खोटले १, माळगाव १, कट्टा गुरामनगरी १ या ग्रामपंचायतींकडून १८ हरकती आल्याची माहिती तहसील प्रशासनाने…

Read More

मत्स्य महाविद्यालयाबाबत मच्छीमार प्रतिनिधींनी मानले आम. नितेश राणेंचे आभार

⚡मालवण ता.२१-: देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित असून या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची घोषणा आमदार नितेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या मत्स्य महाविद्यालयाच्या घोषणेचे मच्छीमार वर्गातून स्वागत केले जात असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ओरोस या ठिकाणी आ. नितेश राणे यांची…

Read More

22 ऑक्टोंबर रोजी वांयगणी घाडी वाडी येथे भजन डबलबारी.

यावेळी सकाळी विधिवत श्रींची पूजाअर्चा दुपारी आरती महाप्रसाद तसेच स्थानिक भजने.यावेळी रात्री दहा वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुवा श्री भालचंद्र केळुसकर विरुद्ध बुवा श्री विनोद चव्हाण यांच्यामध्ये डबलबारीचा सामना रंगणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तभक्त रामदास प्रभू आणि उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी केलेले आहे.. ⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी…

Read More

मालवणात महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२१-: मालवण शहर महिला काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मालवण तालुकास्तरीय ‘माझी रांगोळी माझा सेल्फी’ अशी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी व कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन…

Read More

गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा उमेद फाऊंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद

माजी सभापती शीतल राऊळ बांदा/प्रतिनिधीआपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाच्या भावनेतून उमेद फौंडेशनने वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने केलेले फराळ व कपडे वाटप हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे उद्गार माजी सभापती शीतल राऊळ यांनी येथे काढले.दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात…

Read More

नवरात्रोत्सवात ६ कोटी ४५ लाख ७७ हजाराचे ८०५ जणांना कर्ज वितरण

जिल्हा बँकेचे लक्षवेधी काम;सर्वाधिक कर्ज प्रस्ताव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार ओरोस ता.२१-: उत्सव नवरात्रीचा उत्सव महिला सक्षमीकरणाचा योजनेंतर्गत जिल्हा बँकेने 805 लाभार्थ्यांना 6 कोटी 45 लाख 77 हजार रुपयाचे कर्ज वितरीत केले. दरम्यान बँकेच्या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यासाठी जास्तीत जास्त कर्जदारापर्यंत पोहोचण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नेरुर शाखेच्या शाखाधिकारी युगा पेडणेकर यानी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हाधिकारी…

Read More

सिंधुदुर्गातील व्यावसायिकांसाठी २०० कोटींची तरतूद

मुंबई बँक आणि सिंधुदुर्ग बँकेचे नियोजन;आ प्रवीण दरेकर यांची माहिती ओरोस ता.२१-:- मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग निर्माण होण्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. यातून सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार आहे. पर्यटन आणि स्थानिक उत्पदनाशी अनुसरून व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती व्हावी. तसेच…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता २१नागरीकांना मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे संविधान विरोधी कार्य सत्ताधाऱ्याकडून केले जात असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा युनिट ने केला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. देशात संविधानासमोर अनेक आव्हाने उभी झाली आहेत. त्यामुळे देशातील मुलनिवासी बहुजन समाजाला अनेक अत्याचाराला बळी पडावे लागत…

Read More

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली तात्पुरती स्थगित

शासनाचे पुन्हा आदेश ओरोस ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची झालेली बदली रद्द करीत त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदी तात्पुरती पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने आज याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत.महाराष्ट्र शासनाने…

Read More
You cannot copy content of this page