पोईप येथे २६ रोजी तिरंगी भजन सामना

⚡मालवण ता.२१-: पोईप येथील देव वेताळ मंदिर येथे २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता तिरंगी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंजिवलीचे बुवा प्रवीण सुतार, डुंगो कमला भजन मंडळ, शेळपीचे बुवा दिनेश वागदेकर, लिंगेश्वर भजन मंडळ, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात हा सामना रंगणार आहे. भजन प्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page