⚡मालवण ता.२१-: आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर वतीने दिवाळी २०२२ निमित्त संस्थेच्या सभासदांसाठी फक्त रू.५० मध्ये १०० दिवाळी अंक १ वर्ष कालावधीसाठी वाचावयास देण्यात येणार आहेत.
या दिवाळी अंकांत, आरोग्य, पाककला, कथा, विनोदीसाहित्य, बालसाहित्य, चित्रपट, ज्योतिष, कला व क्रीडा, मनोरंजन इ. विषयक साहित्य उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त वाचक सभासदांनी वाचनालयाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत सांबारी व कार्यवाह श्री अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.
