⚡मालवण ता.२१-: मालवण शहर महिला काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मालवण तालुकास्तरीय ‘माझी रांगोळी माझा सेल्फी’ अशी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी व कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी मुलींनी अथवा महिलांनी स्वतः काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळीचा एक फोटो, त्यात रंग भरलेल्या रांगोळीचा एक फोटो व पूर्ण झालेल्या त्या रांगोळी सोबत एक स्वतःचा सेल्फी फोटो असे तीन फोटो पाठवायचे आहेत, ज्यात रांगोळी स्पष्ट पणे दिसेल. सोबत स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता व्हॉट्सअप मॅसेज करावयाचा आहे. यात आलेल्या सेल्फी फोटो मधून परीक्षकांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धकांचे नंबर निवडण्यात येणार असून शक्य झाल्यास त्या ठिकाणी येऊन परीक्षण देखील केले जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ११००, रु. ९००, रु. ६००, तसेच उत्तेजनार्थ एकूण पाच बक्षिसे रु. ३०० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी पल्लवी खानोलकर- तारी ९०११०५६३१७, गीता नेवाळे – ९४२३८३७८५७, विद्या फर्नांडिस – ७७६७०५३३६४ यांच्याकडे स्पर्धकांनी व्हॉट्सअप मॅसेज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष
अरविंद मोंडकर ९८९२०५५८२० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
