मातोंड येथे योग शिबिर संपन्न
⚡वेंगुर्ला ता.२५-: पतंजली योग समिती सावंतवाडी यांच्या मार्फत व मातोंड गावचे सुपुत्र, निवृत्त केंद्रप्रमुख तथा योग मार्गदर्शक रावजी दुलाजी परब यांच्या प्रयत्नातून योग अभ्यास घराघरात पोचविणे व सर्वांचे जीवन निरोगी, आनंदी, समाधानी व समृद्ध बनविणे या उद्देशाने सहा दिवशीय योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गावातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला.
