Headlines

वेंगुर्ल्यातील “नमो उद्यान” मुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनास नवी चालना

मंत्री ना. नितेश राणे ; वेंगुर्ला भटवाडी येथील नमो उद्यानाचे लोकार्पण

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद आदर्श नगरपरिषद म्हणून काम करीत असून, पारदर्शक कारभारातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले “नमो उद्यान” हे जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रकल्पांपैकी एक असून, यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नव्याने जलदगतीने विकसित करण्यात आलेल्या भटवाडी येथील नमो उद्यानाचे उद्घाटन व लोकार्पण मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे
यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. दिपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रांताधिकारी, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई, उमेश येरम, जगन्नाथ सावंत, अभि वेंगुर्लेकर,मनोज उगवेकर, सत्यविजय गावडे, राजबा सावंत, नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे, बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, समाजकल्याण समिती सभापती युवराज जाधव, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईंणकर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सचिन शेट्ये, महिला व बालकल्याण समिती उपसभापती रिया केरकर , अन्य नगरसेवक, अन्य नगरसेविका तसेच शरद परब, आत्माराम सावंत, रमेश राणे, दिपक राणे, राजन परब, दिलीप कावले, उमेश परब,
अन्य स्थानिक नागरिक
यांच्यासह नगरपरिषद पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या योजनेतून वेंगुर्ला नगरपरिषदेस नमो उद्यान विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार वेंगुर्ला भटवाडी येथील येथे हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, बैठकीची व्यवस्था, योग व व्यायामासाठी जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आकर्षक प्रकाश व्यवस्था, वृक्ष व फुलझाडांची लागवड तसेच सेल्फी पॉइंट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून सोलर बेंच व पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी आ. दिपक केसरकर यांनी कोरॅकल बोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमात नमो उद्यानाचे चांगले काम केल्याबद्दल संबंधित कंत्राटदार, उद्यानातील आकर्षक कमान व शिल्प तयार करणाऱ्या शिल्पकारांचाही सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषदेच्या अभियंता पथकाचाही सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page