चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे
६ नोव्हेंबरला गुणगौरव सोहळा

⚡कणकवली ता.२५-:
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ कणकवली शाखेतर्फे विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार ६ नोव्हेंबरला सकाळी १० वा. येथील मराठा मंडळ हाॅल येथे करण्यात आले आहे.
उद्घाटन उद्योजक सुनील नारकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त उपप्रबंधक हनिफ पटेल मार्गदर्शन करणार आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे , तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, विजय चव्हाण, मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, नगरसेवक अॅड. विराज भोसले, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव, इंजिनिअर डॉ. सुभाषचंदर भांडारे, मंडळाचे जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, डॉ. सतीश पवार उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे सदस्य, समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण (९७६६५९७९५७), सचिव अविनाश चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page