वेंगुर्ल्यातील नागरिकांनी सावंतवाडीतील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली मागणी
⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला शहरातील नागरिकांना शासनाच्या दुर्लक्षामुळे होणारा त्रास लक्षात घेता विशेष बाब म्हणून लवकरात लवकर शहरातील मंजूर दोन पदे नविन पोलिस पाटलांची नियुक्ती करावी व शहरवासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वेंगुर्ल्यातील नागरिकांनी सावंतवाडीतील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
वेंगुर्ला तहसिलदार यना वेंगुर्ल्यातील नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनात वेंगुर्ला शहरामध्ये मागील वर्षापासून दोन्ही पोलिस पाटील पदे रिक्त असून शहरातील अंदाजे १२ हजार लकांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास हेत आहे. एका दाखल्यासाठी शहरापासून ३ किलोमिटरचा प्रवास करावा लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे होणारा त्रास लक्षात घेता विशेष बाब म्हणून दोन पदे नविन पोलिस पाटलांची नियुक्ती करावी व शहरवासीयांना न्याय मिळवून द्यावा असे नमूद केले आहे. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, मनिष सातार्डेकर, प्रदिप कुबल, प्रताप गावस्कर, जयराम वायंगणकर, अॅड.सुषमा खानोलकर, शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – पोलिस पाटील नियुक्ती करण्यासाठी वेंगुर्ला तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
