मातोंड येथील शिबिरात ३० जणांचे रक्तदान

⚡वेंगुर्ला ता.२५-: दीपावलीच्या निमित्ताने श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळ, मातोंड तसेच ग्रामपंचायत मातोंड, लायन्स क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने व ओरोस जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत मातोंडच्या श्री देवी सातेरी सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

  शिबिराचे उद्घाटन सरपंच जानवी परब व लायन्स क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सुश्मिता परब, लायन्स क्लब सचिव अॅड.अभिजित पणदूरकर, खजिनदार अरविंद पोकार, माजी झोन चेअरमन अशोक देसाई, पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, जिल्हा अपंग कल्याण अध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण प्रभू, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता परब, सुभाष सावंत, श्री सातेरी युवक मंडळाचे महेश वडाचेपाटकर, रविकिरण परब, नितीन परब आदी मान्यवर उपस्थित होते.

  दरम्यान या शिबिरात मातोंड गावातील रक्तदाते ज्यांनी वेळेवेळी ठिकठिकाणी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविले असे रक्तदाते नितीन परब-तळवडेकर, सचिन कोंडये, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव बाबली गवंडे, साहिल परब, काशिराम उर्फ अमोल परब, महेश गवंडे, सीताराम झिलू कोंडये, गोविंद मातोंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना जिल्हा रुग्णालय ओरोसचे प्रमाणपत्र देऊन सरपंच जानवी परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस रक्तपेढीचे डॉ.सिम्मी, प्रांजली परब, मयुरी शिंदे, नंदकुमार आडारकर, सुरेश डोंगरे, नितीन गावकर यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार दिपेश परब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळाचे राहुल प्रभू, जगदीश परब, नितीन परब-तळवडेकर, सचिन कोंडये, काशी परब, साहिल परब, देवेश परब, अरुण रेडकर, संजिव परब, देवेंद्र परब, देवदास परब, सागर परब, गिरीष प्रभू, नंदू परब, पूजा वराडकर, स्वप्नील परब, शांताराम परब, अक्षय परब, प्रदीप परब, तात्या सावंत, चंद्रकांत गावडे, अक्षय सावंत, तुषार पालव, विठ्ठल सावंत, चिदानंद वराडकर यांनी मेहनत घेतली.
You cannot copy content of this page