Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आरबीआय मधील नोकरीच्या संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न

⚡सावंतवाडी ता.२६-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वाणिज्य तसेच बँकिंग अँड इन्शुरन्स आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आरबीआय मधील नोकरीच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले,आरबीआयच्या असिस्टंट जनरल मॅनेजर दीपिका नेगी,असिस्टंट मॅनेजर श्री प्रफुल्ल ठाकूर,श्री निखिल आमटे तसेच श्री रीशी यादव…

Read More

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा वरून राष्ट्रवादी आक्रमक…

वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर; वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील वीज पुरवठा सध्या वारंवार खंडित होत असल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथील वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. दरम्यान लोड शिफ्टींगमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित करावा लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली…

Read More

तरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.२६-: श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्टच्यावतीने तरंदळे खोतवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकुण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे २ दुर्मिळ रक्तदात्यांनी व २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी…

Read More

मळगाव येथील मायापूर्वचारी देवाचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ : मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या श्री देव मायापूर्वचारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २७ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी मिरवणुकीनंतर मळगाव येथील स्थानिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ…

Read More

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कळसुलकरचा संघ विजयी

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे- अथर्व संजय शेडगे, ओम शामसुंदर परब, गजानन दिनेश परब, जतीन प्रशांत राऊळ, नेहाल दत्ताराम सावंत, बच्चू न्हानू ठाकूर, राजदीप उदय बांदेलकर, विशेष रवींद्र ठाकूर, सत्यजित परशुराम गावडे, समर्थ रामचंद्र…

Read More

गुळदूवे-आरोंदा मुख्य रस्त्यावरील झाडी तोडल्याने गुळदुवे ग्रामस्थांच्या मागणीला यश

बांधकामने घेतली निवेदनाची दखल;ग्रामस्थ, वाहनधारकांकडून समाधान ⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-:* गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडी बांधकाम विभागाच्यावतीने आज तोडण्यात आली. त्यामुळे गुळदुवे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे निवेदनातून केलेल्या मागणीला अखेर यश आल आहे. यामुळे येथील ग्रामस्थ, वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मळेवाड-गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली…

Read More

शिवडाव येथील ५७ वर्षीय महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

वैभववाडी प्रतिनिधीकणकवली शिवडाव येथील सौ जयश्री जनार्दन खरात वय वर्ष 57 यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित राहात्या घरी निधन झाले.वैभवाडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस प्रीती दशरथ शिंगाडे यांच्या मातोश्री होय. पश्चात पती, विवाह दोन मुलगे, तीन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ८ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

कै आनंदीबाई रावराणे यांच्या २८ व्या स्मृती प्रित्यर्थ आयोजन वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ८ डिसेंबर,२०२२ रोजी कै.आनंदीबाई रावराणे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय आनंदीबाई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे. दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय…

Read More

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सामाजिक न्याय भवन येथे शनिवार दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. 0000

Read More

रेडी तिवरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा कलशारोहण २ डिसेंबर पासून

बांदा/प्रतिनिधीरेडी-तिवरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण तसेच श्री दत्त महाराजांच्या पार्थिव मूर्तीची व पादुकांची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २ ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.शुक्रवारी दिनांक २ रोजी सकाळी यजमान शरीरशुद्धी, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्यहवचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य पूजन, प्रकार शुद्धी, देवता जलाधीवास, शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी…

Read More
You cannot copy content of this page