तरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.२६-: श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्टच्यावतीने तरंदळे खोतवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकुण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विशेष बाब म्हणजे २ दुर्मिळ रक्तदात्यांनी व २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सावंत, ट्रस्ट अध्यक्ष संतोष गंगाराम सावंत, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रमुख डॉ. तपसे, तरंदळे उपसरपंच संदेश सावंत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डाॅ.विद्या रासम,परिचारिका सौ.माईणकर व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. पद्मश्री हळदणकर यांसह ट्रस्ट विश्वस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page