वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा वरून राष्ट्रवादी आक्रमक…

वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर; वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील वीज पुरवठा सध्या वारंवार खंडित होत असल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथील वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे.


दरम्यान लोड शिफ्टींगमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित करावा लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र यापुढे अशा कोणत्याही प्रकार लाईट जाणार नसल्याचा हमी यावेळी अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर,हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू.याकुब शेख आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page