⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ : मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या श्री देव मायापूर्वचारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २७ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी मिरवणुकीनंतर मळगाव येथील स्थानिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव देवस्थान कमिटीने केले आहे.
