तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कळसुलकरचा संघ विजयी

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे- अथर्व संजय शेडगे, ओम शामसुंदर परब, गजानन दिनेश परब, जतीन प्रशांत राऊळ, नेहाल दत्ताराम सावंत, बच्चू न्हानू ठाकूर, राजदीप उदय बांदेलकर, विशेष रवींद्र ठाकूर, सत्यजित परशुराम गावडे, समर्थ रामचंद्र गुळेकर, समर्थ शशिकांत राऊळ, समर्थ प्रदीप देसाई, स्वरनिम उन्मेश सावंत, हर्ष गणपत कदम, आदित्य अभयकुमार म्हापसेकर, प्रथमेश महादेव सावंत हे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री नारायण शंकर केसरकर तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री अरुण भिसे, जितेंद्र म्हापसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सर्व संचालक मंडळ,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कार, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी केले.

You cannot copy content of this page