बांदा/प्रतिनिधी
रेडी-तिवरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण तसेच श्री दत्त महाराजांच्या पार्थिव मूर्तीची व पादुकांची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २ ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
शुक्रवारी दिनांक २ रोजी सकाळी यजमान शरीरशुद्धी, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्यहवचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य पूजन, प्रकार शुद्धी, देवता जलाधीवास, शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी शांतीपाठ, प्राकार शुद्धी, देवता आवाहन, वास्तूयजन, रविवार दिनांक ४ रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी शिखरकलश स्थापना, दुपारी १२ वाजून ३५ मिनिटे या मुहूर्तावर श्री दत्तमहाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, त्यानंतर महाप्रसाद व सायंकाळी विविध मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी दत्त जयंती निमित्त पादुका अभिषेक, दुपारी महाआरती व महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव दत्त मंदिर ट्रस्ट व श्री देव दत्त मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
रेडी तिवरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा कलशारोहण २ डिसेंबर पासून
