आता प्रशासनाला सहकार्य नाही; अवैध मासेमारीविरोधात पारंपारिक मच्छीमार छेडणार जनआंदोलन
मत्स्य विभागाच्या कारभाराविरोधात पारंपारिक मच्छीमार आक्रमक ⚡मालवण ता.३०-: जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी, पर्ससीन नेटद्वारे अवैधरित्या मासेमारी होत असताना मत्स्यव्यवसाय खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसून सागरसुरक्षा रक्षकांची त्यांना साथ असल्याचा आरोप करत आक्रमक बनलेल्या पारंपारिक मच्छीमारांनी आज सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्व सागर सुरक्षारक्षकांना तत्काळ निलंबित करण्यात यावे तसेच गस्तीनौकाही कायमस्वरूपी…
पायी हळू हळू चाला… मुखाने भालचंद्र बोला…
परमहंस भालचंद्र महाराज यांची शहरातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक ⚡कणकवली ता.३०-: पायी हळू हळू चाला… मुखाने भालचंद्र बोला…भालचंद्र महाराज की जय…अशा नाम घोषात योगी यांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांची शहरातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हा पालखी सोहळा जणू काही विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आळंदी व देहुतील पालखी सोहळ्यासारखा…
राज ठाकरे जिल्ह्यात दाखल
मनसेकडून सावंतवाडीत जंगी स्वागत ⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सावंतवाडीत आगमन झाले असून गवळी तिठा येथे त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
श्री रामेश्वर मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी जगदीश खराडे
उपाध्यक्ष हेमंत जोशी: निवडी बिनविरोध मालवण दि प्रतिनिधीमालवण दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनेलेच जगदीश खराडे तर उपाध्यक्षपदी हेमंत जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेच्या सचिव सतेजा वायंगणकर, संचालक पंकज सादये, जीवन भगत, संतोष ढोके, रुपेश…
चिवला बीच येथे साकारणार राज ठाकरे यांचे वाळू शिल्प
जिल्हा दौऱ्या निमित्त आयोजन मालवण दि प्रतिनिधीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ डिसेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापारी सेना व लॉटरी विक्रेता सेना यांच्यावतीने चिवला बीच येथे राज ठाकरे यांचे वाळू शिल्प साकारण्यात येणार आहे. शिल्प प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.
मडुरा विकास सोसायटीच्या वाटचालीत सर्वांचेच योगदान
चेअरमन संतोष परब : मडुरा सोसायटीच्या शौचालयाचे उद्घाटन ⚡बांदा ता.३०-: सोसायटीच्या सर्व सभासद, संचालक व सहकाऱ्यांची गेली अनेक वर्षे होणारी गैरसोय लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने आज एक चांगले शौचालय उभारण्यात आले. संस्थेच्या वाटचालीत सर्वांचेच भरीव योगदान मिळाल्याने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकलो, असे प्रतिपादन मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी…
अंमली पदार्थ लागवडीबाबत महसूल, पोलीस, कृषी, वन विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी
उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: अंमली पदार्थ लागवडीबाबत महसूल, पोलीस, कृषी, वन विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे…
वागदे टेंबवाडी येथील राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत मोठ्या निशा जाधव, आचरा ग्रुप, सार्थ ग्रुप रत्नागिरीचा बाजी
लहान गटात हर्षदा गावकर, आर्या वागदेकर प्रथम कणकवली 30 नोव्हेंबर (प्रतिनिधी)-मार्गेश्वर क्रिडा मंडळ व पावणादेवी प्रा.भजन मंडळ वागदे टेंबवाडी आयोजित राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स,ग्रुप डान्स स्पर्धेत मोठ्या गटात रत्नागिरीची निशा जाधव प्रथम,तर ग्रुप डान्समध्ये श्री देव रामेश्वर आचरा ग्रुप व कला सार्थ ग्रुप रत्नागिरी प्रथम तर लहान गटात हर्षदा गावकर, आंब्रड-कुसबे प्रथम तर स्थानिक गटात आर्या…
चिपळूण येथे 4 डिसेंबरला परीट समाजाचा कोकण विभागीय मेळावा
⚡सावंतवाडी ता ३०- : अखिल भारतीय धोबी महासंघ महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या कोकण विभागीय मंडळ , रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाज बांधव व भगिनींचा पहिला स्नेह मेळावा रविवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कोकणचे नेते महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम…
