चिपळूण येथे 4 डिसेंबरला परीट समाजाचा कोकण विभागीय मेळावा

⚡सावंतवाडी ता ३०- : अखिल भारतीय धोबी महासंघ महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या कोकण विभागीय मंडळ , रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाज बांधव व भगिनींचा पहिला स्नेह मेळावा रविवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कोकणचे नेते महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथील पेठमाप परीद आळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत गाडगेबाबा व्यासपीठ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकांत कनोजिया, अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, महाराष्ट्र धोबी सेवा मंडळ महिला प्रदेशाध्यक्ष सौ समाताई रंधे, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सुषमाताई अमृतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 9 चहा व नाष्टा, 9 ते 10 पेठमाप भागातून शोभायात्रा , 10 ते 11 नृत्यकला व हळदी कुंकू स्वागत, स्वागत गीत 11 ते 2, संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन स्वागत गीत मान्यवरांचे स्वागत व मान्यवरांचे मनोगत तसेच समाजातर्फे पुरस्कार वितरण दुपारी 2 ते 4 स्नेहभोजन अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता होणार तरी.
तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील परीट बंधू भगिनींनी या मेळाव्याला उपस्थित रहावे व मेळाव्याची शोभा वाढवावी असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर व सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी केले तरी. अधिक माहितीसाठी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर मो.बा. 9422586114 यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page