वागदे टेंबवाडी येथील राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत मोठ्या निशा जाधव, आचरा ग्रुप, सार्थ ग्रुप रत्नागिरीचा बाजी

लहान गटात हर्षदा गावकर, आर्या वागदेकर प्रथम

कणकवली 30 नोव्हेंबर (प्रतिनिधी)-मार्गेश्वर क्रिडा मंडळ व पावणादेवी प्रा.भजन मंडळ वागदे टेंबवाडी आयोजित राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स,ग्रुप डान्स स्पर्धेत मोठ्या गटात रत्नागिरीची निशा जाधव प्रथम,तर ग्रुप डान्समध्ये श्री देव रामेश्वर आचरा ग्रुप व कला सार्थ ग्रुप रत्नागिरी प्रथम तर लहान गटात हर्षदा गावकर, आंब्रड-कुसबे प्रथम तर स्थानिक गटात आर्या घाडीगावकर,वागदे प्रथम यांनी यश प्राप्त केले.
मार्गेश्वर क्रिडा मंडळ व पावणादेवी प्रा.भजन मंडळ वागदे टेंबवाडी येथे राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केली होती.

सकाळच्या सत्रामध्ये सत्यनारायण महापूजा, गवळदेव पूजा मार्गेश्वर मंदिर टेंबवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी आरती, महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री 8 वाजता 26-11 च्या मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान कमांडोज, पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच या हल्ल्यात मृत पावलेल्या 166 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कणकवलीच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली बगडे, हवालदार विनोद चव्हाण, वैभववाडी भुईबावडा सुपुत्र उद्योगपती सुनिल नारकर, ऊर्जा मंत्री स्विय सहाय्यक दिपकभाऊ सावर्डेकर , पोलीस पाटील सुनिल कदम उपस्थित होते.
वृषाली बरगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे अक्षय गावडे, विरेन गायकवाड, अजिंक्य गावडे, सुनिल गावडे, सागर गावडे, सिद्धेश गावडे, रविंद्र गावडे, अनिकेत गावडे, सचिन गावडे, दशरथ गावडे, दिपक गावडे, प्रकाश गावडे, प्रदीप गावडे, गणेश तेजम, मंदार तेजम, स्वप्निल तेजम, निखिल तेजम, गौरव गावडे, लक्ष्मण गावडे, विनायक गावडे, विनायक विश्वनाथ गावडे, सचिन सिताराम गावडे, गणेश गावडे, सुनिल एकनाथ गावडे, संदिप गावडे, संकेत गावडे, नयन गावडे, संतोष सावंत, प्रशांत गावडे, ओमप्रकाश गावडे, तन्मय गोरुले, साहिल गुंजवटे, राजाराम गावडे, सुहास गावडे, शांताराम गावडे, महेश गावडे. या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी 123 कलाकारांनी सहभाग घेतला होता. तसेच लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला परीक्षक म्हणुन सौ. माधवी सावंत, श्री. संतोष कांबळे, श्री आजगावकर ( दादर मुंबई ) यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल – स्थानिक क्रमांक -आर्या घाडीगांवकर.लहान गट – प्रथम – हर्षदा गांवकर. द्वितीय – करिष्मा दास .
द्वितीय – स्वरा पावसकर.
तृतीय – काव्या प्रवीण गावडे.
उत्तेजनार्थ – वैष्णवी मुळणकर.
उत्तेजनार्थ – सोहम जांभोरे.
उत्तेजनार्थ – भक्ती सावंत.
मोठा गट – प्रथम – निशा जाधव.द्वितीय – ऋतिक निकम. द्वितीय – जामसंडेकर तृतीय – पूर्वा मेस्त्री. उत्तेजनार्थ – शंकर गवस – दिशा नाईक.
ग्रृप डान्स – प्रथम – कला सार्थ ग्रृप – रत्नागिरी,प्रथम – श्री रामेश्वर आचरा .द्वितीय – अष्टपैलू मालवण .द्वितीय – एस.के.डान्स कणकवली.तृतीय – सागर सारंग कुडाळ.उत्तेजनार्थ – RDX सावंतवाडी .उत्तेजनार्थ – यंगस्टार मालवण.या स्पर्धेचे संपूर्ण सूत्रसंचालन विलास गोलतकर यांनी केले.

You cannot copy content of this page