श्री रामेश्वर मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी जगदीश खराडे

उपाध्यक्ष हेमंत जोशी: निवडी बिनविरोध

मालवण दि प्रतिनिधी
मालवण दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनेलेच जगदीश खराडे तर उपाध्यक्षपदी हेमंत जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

यावेळी संस्थेच्या सचिव सतेजा वायंगणकर, संचालक पंकज सादये, जीवन भगत, संतोष ढोके, रुपेश साळगावकर, दत्ता माणगावकर, प्रवीण मेस्त, तुषार आचरेकर, दिलीप पराडकर, रवींद्र चांदेरकर, मृणाली कोयंडे, अर्चना आचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page