जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामधील निबंध स्पर्धेत निरजा परब प्रथम
⚡कणकवली ता.०४-:शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित पन्नासावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022-23 हे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामधील इयत्ता पहिली ते आठवी या प्राथमिक गटामध्ये आयोजित निबंध स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेतील इयत्ता सातवीमधील निरजा संजय परब हिने प्रथम क्रमांक पटकावला…
