घरातील माणसांनी केलेल्या सत्काराने भारावलो

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक दशरथ घाडी यांचे प्रतिपादन

⚡बांदा ता.०३-: ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनच मी आज या पदापर्यंत पोहचलो. माझ्या ३२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मुख्याध्यापक या पदावर काम करून सेवानिवृत्त झालो. आज आपल्या घराच्या माणसांकडून झालेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यामागे माझ्या सौभाग्यवतीचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन दशरथ घाडी यांनी येथे केले.
श्री घाडी यांचा सत्कार कार्यक्रम व सौ. अस्मिता घाडी यांचा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम नुकताच येथे संपन्न झाला. त्यावेळी श्री घाडी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब, माजी जि.प.सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सरपंच दिपक सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक बांदा शाखाअधिकारी सिताराम गावडे, संदिप बांदेकर, अभय सातार्डेकर, राजाराम म्हावळणकर, माजी ग्रा.पं सदस्या सौ. अनुजा सातार्डेकर, सौ. लक्ष्मी सावंत, गुरूनाथ सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. घाडी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पद्मावती स्वयंम सहाय्यता समुहच्या अध्यक्षा सौ. अस्मिता घाडी यांचा वाढदिवस सुद्धा या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी प्रविण कळंगुटकर, कळंगुटकर प्रमोद कळंगुटकर, विठ्ठल कळंगुटकर, राकेश परब, उमेश झाट्ये, पुर्णलेखा म्हावळणकर, सुप्रभा गावडे, सोहम सावंत, पार्थ नेमण, शिवम गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डिंगणे माजी सरपंच नाना सावंत यांनी केले तर आभार प्रमोद कळंगुटकर यांनी मानले.

You cannot copy content of this page