अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी ठेवी वाढवा

आ राणे: नूतन संचालकांचा केला सत्कार

देवगड ता.०३-:
देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक ही लहान असली तरी ग्राहकांचा विश्वास सांभाळत बँकेचे कामकाज वाढविणे हे प्रत्येक संचालकाचे काम असून बँकेच्या प्रगती करिता ठेवींमध्ये वाढ करीत असताना तेवढ्याच प्रमाणात कर्जपुरवठा व कर्ज वसुली करणे हेही प्रत्येक संचालकाची त्याचबरोबर बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे इच्छाशक्ती जिद्द व चिकाटी जर प्रत्येकाने संचालकाने अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगी बाळगली तर निश्चितपणे बँकेच्या उत्कर्षाकरिता धाडसी निर्णय घेता येतात व यासाठी बँकेमार्फत नवनवीन योजना विशेषतः आंबा काजू मासेमारी बरोबर या भागातील विद्यार्थी व महिला वर्गांकरिता देखील नवनवीन योजना एक वेगळ्या दृष्टिकोन ठेवून कामकाज करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शिवम पॅनेलच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले
: देवगड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी दि देवगड
अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक निवडणूकित भाजप राष्ट्रवादी आघाडीचे शिवम पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून .
.या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविले या निमित्ताने या पॅनेलचे नेते आम.नितेश राणे ,यांनी
शिवम पॅनलचे सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून विशेष सत्कार देवगड अर्बन बँके प्रधान कार्यालय सभासद भवन या ठिकाणी करण्यात आला.या वेळी शिवम पॅनेलचे प्रमुख नेते माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ ,प्रकाश खडपे,संदीप साटम संचालक,प्रकाश राणे,सदाशिव ओगले,अभय बापट भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते या वेळी सर्वसाधारण गटातून विजयी झालेले संचालक
सदाशिव पु.ओगले, प्रकाश बा राणे अभय ज.बापट ऍड , डॉ.अमोल ज.तेली, समीर य.पेडणेकर
: महिला राखीव मधून .ललिता गजानन शेडगे,वैशाली विद्याधर तोडणकर .इतर मागास अनुसूचित जाती जमाती गटातून ,सुरेंद्र नारायण चव्हाण विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग संजय प्रभाकर बांदेकर,यांचा सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने आम.नितेश राणे यांच्या सत्कार माजी आम.अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.स्वागत सूत्रसंचालन मनोज सहस्त्रबुद्धे,श्रीकांत बिडये यांनी करुन प्रास्तविक सदाशिव ओगले यांनी केले.संचालक प्रकाश राणे,अभय बापट यांनी मार्गदर्शन केले.
माजी आमदार अजित गोगटे यांनी आपल्या मार्गदर्शन करताना बँकेचे ठेवीदार,कर्जदार,सभासद यांचा विश्वास संपादित बँकेचा विकास विस्तार करण्याची जबाबदारी सर्व संचालक यांची आहे.रिझर्व्ह बँकेची धोरणे जाचक असली तरी त्याचे 👌काटेकोरपणे पालन प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना दर्जेदार सौजन्यपूर्ण सेवा द्यावी.कर्मचारी वर्गाने ठेवी वाढविणे,तसेच नवनवीन तंत्र आत्मसात करणे महत्वाचे आहे.असे सांगितले.
या निमित्ताने शिवम पॅनेलचे नेते नंदकुमार घाटे यांची त्यांच्या निवासस्थानी आम.नितेश राणे यांनी भेट घेऊन विशेष अभिनंदन केले.

You cannot copy content of this page