आदर्श व्यापारी संघटना तळेरेचा वर्धापनदिन कार्यक्रमांनी साजरा

⚡कणकवली ता.०३-: आदर्श व्यापारी संघटना तळेरेचा ६६ वा वर्धापनदिन विविध भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा कै.दत्तात्रय तुकारामशेठ जठार यशस्वी उद्योजीका पुरस्कार २०२२-२३ तळेरे येथील नक्षत्र निवास व न्याहारीच्या योजनाधारक सौ.चित्रा चंद्रकांत जठार यांना मान्यवराच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघांचे कार्यवाह नितीन वाळके,उपाध्यक्ष -महेश नार्वेकर,कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,उपसरपंच शैलेश सुर्वे,आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष -स्वप्नील कल्याणकर, जिल्हा सह कार्यवाह -राजू जठार, खजिनदार -राजेंद्र पिसे, सेक्रेटरी-आदित्य महाडिक,अमोल सोरप, प्रमोद खटावकर, तात्या पिसे, सचिन पिसे,श्री.भोगले,श्री.गाड, विश्वजित तळेकर, दाजी कदम,विठोबा माळवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर समृध्दी चव्हाण आणि संतोष तळेकर यांचे संगीत भजन सादर करण्यात आले.तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर शुभंम पाळेकर (मुटाट) आणि संदेश नाईकधुरे (बापार्डे) या दोन बुवांच्या दरम्यान ट्वेंटी- ट्वेंटी डबलबारी भजनाचा सामना चांगलाच रंगला होता. तर रात्री कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक “भिंती” सादर करण्यात आले होते.सर्व कार्यक्रमांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजू जठार व प्रविण वरुणकर यांनी केले.

You cannot copy content of this page