Headlines

कोमसापच्या सिंधुदुर्ग नाट्यशाखेची स्थापना

चार कलाकारांची समितीवर निवड

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) नाट्यशाखेची स्थापना करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाट्यशाखेची समिती जाहीर करण्यात आली आहे. कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि नाटककार प्रदीप ढवळ यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या समितीची घोषणा केली.
या समितीवर अभय खडपकर (कणकवली), सौ. वर्षा वैद्य (कुडाळ), संजय शिंदे (मालवण) आणि अभिनेते-दिग्दर्शक दत्तात्रेय ऊर्फ बाळ पुराणिक (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्गातील नाट्यकलेला मोठी परंपरा असून, सुमारे १७५ वर्षांची संगीत नाट्यपरंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बाळ पुराणिक करीत आहेत. वर्षा वैद्य यांनी बालनाट्य लेखनासह विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या असून, एकांकिका स्पर्धां, नाटके यामध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संजय शिंदे हे नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार म्हणून कार्यरत आहेत. तर अभय खडपकर यांनी नाट्य, चित्रपट तसेच विविध कलाक्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
सिंधुदुर्गातील या चारही कलाकारांची नाट्यशाखेच्या समितीवर झालेली निवड कौतुकास्पद असून, त्यांच्या कार्याला कोकण मराठी साहित्य परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रदीप ढवळ यांनी यावेळी दिली.
यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. संतोष सावंत, रुजारिओ पिंटो, खजिनदार अनंत वैद्य, सहसचिव अभिमन्यू लोंढे, सुरेश पवार, संतोष वालावलकर, दीपाली काजरेकर, वृंदा कांबळी, संदीप वालावलकर, दीपक पटेकर, बंड्या जोशी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page