जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामधील निबंध स्पर्धेत निरजा परब प्रथम

⚡कणकवली ता.०४-:
शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित पन्नासावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022-23 हे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामधील इयत्ता पहिली ते आठवी या प्राथमिक गटामध्ये आयोजित निबंध स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेतील इयत्ता सातवीमधील निरजा संजय परब हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल तिला सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

शाळेच्यावतीने श्रावण गावचे सरपंच नम्रता मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम परब, शिक्षण प्रेमी सदस्य उमेश श्रावणकर यांच्या हस्ते इंग्रजी डिक्शनरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निरजाची आई संजना संजय परब तसेच मार्गदर्शक शिक्षक साक्षी कुबल यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर शिक्षक विनायक हरकुळकर, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल गावचे उपसरपंच दुलाजी परब, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, पोलीस पाटील धाकू दळवी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर मुद्राळे, श्रावण केंद्राचे केंद्रप्रमुख देवू जंगले तसेच गावातील ग्रामस्थ केंद्रातील शिक्षक आणि पंचक्रोशीमध्ये या यशाबद्दल निरजावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. निरजाच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विनायक हरकुळकर यांनी मांडले.

You cannot copy content of this page