मद्यमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या “एए”चा आंगणेवाडी यात्रेत स्टॉल

⚡कणकवली ता.०३-: मद्यमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहोलीक ॲनॉनिमस या संस्थेतर्फे शनिवार ४ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी यात्रेत स्टॉल लावण्यात येणार आहे. ज्यांना मनापासून दारु सोडण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्या कुटुंबियांनी स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संस्थेतर्फे कोणतेही औषध अथवा इतर विभुतीसारखे पदार्थ देऊन मद्य सोडविण्यात येत नाही. तर ज्यांना खरोखरच दारु सोडायची इच्छा आहे, अशा व्यक्तींना मद्यमुक्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव अथवा उदाहरणे देऊन याबाबत सांगण्यात येते. तसेच मद्यमुक्त होण्यासाठी सहकार्य करण्यात येते. ते देखील कोणतेही मोबदला न घेता. विशेष म्हणजे मद्यमुक्त झाल्यानंतर मद्यमुक्तीचा वाढदिवसही साजरा करण्यात येतो. या संस्थेचे जगभरात सदस्य आहेत. ज्यांना या सेवा कार्यात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आंगणेवाडी यात्रेतील आंगणेवाडी भराडी देवी मंदिरासमोरील प्राथमिक शाळेच्या बाजूला अंगणवाडी समोर असलेल्या ‘एए’च्या स्टॉलला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ‘एए’च्या राजन जी (७०३८८७५५००), संतोष डी. भानुदास के यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन ‘एए’ संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page