Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात भव्य रक्तदान शिबिर…

मच्छीमारांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मोफत नोंदणी सुविधाही उपलब्ध.. ⚡देवगड ता.१९-:पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देवगड मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २१ जून) सकाळी ९ वाजता जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या सामाजिक कार्यात योगदान…

Read Full News

निम्मेवाडी–चव्हाटा मंदिर पायवाटीच्या चिरेबंदी कामाचे भूमिपूजन…

नगरसेवक राकेश राणे यांच्याहस्ते झाले भूमिपूजन ⚡कणकवली ता.१९-: शहरातील निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर या परिसरातील पायवाट गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. देवतरंग देवस्थळी ये-जा करणाऱ्या भाविकांना मार्गाच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पायवाटीच्या कामाची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती. अखेर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक राकेश राणे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर व मयुरेश मालवणकर जिल्ह्यातील पहिले राज्य बुदधिबळ पंच…

⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र बुदधिबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशन यांनी संयुक्तरित्या रत्नागिरी येथे राज्यस्तरीय बुदधिबळ पंच-आर्बिटर लेखी परीक्षेचे आयोजन केले. रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशनतर्फे प्रथम दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा आणि पंच परीक्षेत राज्यातील तब्बल पंचेचाळीस जणांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचा सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर व मालवणचा मयुरेश मालवणकर यांनी कार्यशाळेत सहभाग…

Read Full News

दाभोली येथीलअंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर…

वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील निमुसगा ते दाभोली कार्यक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्तानजीक विद्युत वितरण मार्फत अंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे काम सुरू असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. हे काम योग्य रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावे, यासाठी भाजपच्या वायंगणी पंचायत समिती सदस्य शितल राऊत यांनी शासनाकडे पाठपुरावा केला…

Read Full News

आंबोलीच्या जंगलात वनविभागाची धडक कारवाई…

वन्यजीव शिकारी करणारे आठ संशयित आरोपी ताब्यात:दोन कारवायांत बंदूक, मृत वन्यजीव व वाहन जप्त; फरार दोघांचा शोध सुरू.. ⚡सावंतवाडी ता.१७-:आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. एका कारवाईत चौकुळ येथील एक जण तर दुसऱ्या कारवाईमध्ये कोल्हापुरातील सात जणांवर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात…

Read Full News

मालवणला एकविसाव्या शतकातील विकसित शहर बनविणार…

आम. निलेश राणे :मालवणात तीन विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.. ⚡मालवण ता.१८-:मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या रॉक गार्डनचे सुशोभीकरण, गवंडीवाडा येथे मालवण नगरपरिषद नमो उद्यान आणि मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण या तीन कामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मालवण शहर…

Read Full News

पीकविमा नक्की कोणाच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांच्या की विमा कंपन्यांच्या ?

मालवणातील बैठकीत आंबा काजू उत्पादकांचा सवाल.. ⚡मालवण ता.१८-:खराब हवामानामुळे यावर्षी आंबा व काजूचे उत्पादन कमी झाले असताना विमा कंपनीने नुकसान भरपाई मधून मालवण तालुक्यातील काही गावे वगळल्याबाबत तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक आक्रमक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर आंबा व काजू उत्पादकांच्या मागणीनुसार आज मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व विमा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या…

Read Full News

मालवणात २० रोजी ‘मुलांचे शिवराय’ कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-:मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरिक्त आहारी गेलेल्या आजच्या युवा पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अन् पराक्रम दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतील. याच उद्देशाने २० जून रोजी मालवणातील ‘दैवज्ञ भवन’ येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ‘मुलांचे शिवराय’ या विशेष आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,…

Read Full News

कचरा जाळण्यासाठी मालवण नगरपालिका वार्षिक २ कोटी खर्च करतेय का …?

नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्याकडून डम्पिंग ग्राउंडचा स्पॉट पंचनामा.. ⚡मालवण ता.१८-:मालवणमधील ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी आज शहरातील आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडच्या दुरावस्थेचा व्हिडीओ बनवून ऑन दि स्पॉट पंचनामा केला. डम्पिंग ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावर पडलेला असून तो कचरा गायी गुरे खात असल्याचे तसेच कचरा विलगीकरण न करता थेट जाळला जात असल्याचे…

Read Full News

सावंतवाडीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा…

⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातीलसालईवाडा येथे बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी याच्या सांगण्यावरून दोघे एका सायकल…

Read Full News

You cannot copy content of this page