Headlines

Global Maharashtra Breaking News

तुळसमधील एकही शाळा शिक्षकाविना राहू नये

गटशिक्षणाधिका-यांचे वेधले लक्ष ⚡वेंगुर्ला ता.०७-: शिक्षकांच्या बदल्यांमुळे तुळस गावातील प्राथमिक शाळांमधील रिक्त झालेल्या पदांबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. दरम्यान, तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपले स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे. फोटोओळी – शिक्षक भरतीबाबत गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.

Read More

एसटी डेपो व बस स्थानकांना व्हिलचेअरचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ल्याचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ मुंबईचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले यांच्या संकल्पनेतून अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी डेपोंना मोफत व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ डेपो होणार आहे.

Read More

सायकल रॅली काढत साजरा झाला जागतिक सायकल दिन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आयोजन ओरोस ता.०७-: शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे यांसह सर्व शरीराच्या इतर आजारांवर सायकल ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मुख्य लोक अभिरक्षक वकील डि के गावकर यांनी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅली कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई…

Read More

आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू करावे

आंबोली,७: सुस्त प्रशासनाचा बेशिस्त कारभारामुळे आंबोलीत तलाठी कार्यालयासाठी लाखो रुपये शासन खर्च करून देखील तलाठी कार्यलय नाही.महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार,प्रांत यांनी आंबोलीत पाऊस सुरू होण्याआधी तलाठी कार्यलय सुरू करावे.अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा अनिल चव्हाण यांनी दिला आहे. आंबोलीत तलाठी कार्यालय हे गळक्या आणि नादुरुस्त इमारतीत सुरू असुन…

Read More

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे
१० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन ⚡कणकवली ता.०७-: बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली. कोकणातील कवीना…

Read More

देवगड जामसांडेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

राष्ट्रवादीचे नेते घाटे यांचे तहसीलदार यांना निवेदन ⚡देवगड ता.०६-: नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा पुरवण्यात याव्या व देवगड जामसंडे शहराला भेडसावणारा पाणी प्रश्नापासून शहरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार यांच्याकडे…

Read More

आदित्य ठाकरेंच्या वाढदिनी युवासेनेचे विविध उपक्रम

वृक्षारोपण, फळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन;गणेश गावकर, फरीद काझी यांची माहिती ⚡देवगड ता.०६-: शिवसेना युवासेना नेते आम.आदित्य ठाकरे यांच्या १३ जून वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अधिकारी सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका युवा सेनेच्या वतीने दि.१३ जून रोजी देवगड ग्रामीण रुग्णालयात फळवाटप,वृक्षारोपण ,दि.१४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड…

Read More

पावसाळ्यापूर्वी वीज वितरण दुरुस्तीची कामे पूर्ण करा

वीज वितरणला राष्ट्रवादीच्या नंदकुमार घाटे यांचे निवेदन ⚡देवगड ता.०६-: देवगड जामसंडे शहरासह तालुक्यातील पावसाळी हंगामात वीजप्रवाह खंडित होणार नाही .यासाठी आवश्यक ती दुरुस्ती उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी.दि.२९ मे रोजी दुरुस्ती करीता वीजप्रवाह दिवसभर खंडित करण्यात आला होता. परंतु काही भागातील वीज रात्री दीड वाजेपर्यंत सुरळीत झाली नव्हती अशी परिस्थिती ऐन पावसाळ्यात येऊ नये यासाठी आवश्यक…

Read More

५ कोटींच्या निधी मंजुरी बाबत आम. वैभव नाईक यांची बनवाबनवी उघड – अमित इब्रामपूरकर

⚡मालवण ता.०६-: आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण, डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी कणकवली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली किती निधी मंजूर झाला. देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता आदी बाबींबाबत…

Read More

सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक खराडे यांचे निधन

⚡मालवण ता.०५-: देवबाग येथील मूळ रहिवासी आणि सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक कान्हू खराडे (वय ७४) यांचे रविवारी मुंबईतील चेंबुर येथील निवासस्थानी निधन झाले. राजभवन पुरालेखागार निर्मिती विभागाचे मुख्य संशोधकीय अधिकारी म्हणून अशोक खराडे यांनी सेवा बजावली होती. पुराभिलेख- विभागातून अभिलेखाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. २००९ साली त्यांच्यावर राजभवन पुरालेखागाराची जबाबदारी सोपविण्यात आली. यात १९३४ ते…

Read More
You cannot copy content of this page