⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ल्याचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ मुंबईचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले यांच्या संकल्पनेतून अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी डेपोंना मोफत व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ डेपो होणार आहे.
तरी कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, देवगड, सावंतवाडी या बस डेपोंचे तसेच आंबाली व शिरोडा या बसस्थानकातील प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहून व्हिलचेअर घ्यावात असे आवाहन करण्यात आले आहे.
