तुळसमधील एकही शाळा शिक्षकाविना राहू नये

गटशिक्षणाधिका-यांचे वेधले लक्ष

⚡वेंगुर्ला ता.०७-: शिक्षकांच्या बदल्यांमुळे तुळस गावातील प्राथमिक शाळांमधील रिक्त झालेल्या पदांबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. दरम्यान, तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपले स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे.

  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमुळे संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील अनेक पदे रिक्त झाली आहेत, त्याचपमाणे तुळस गावातील काही शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त झालेली आहेत.

  येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असुन सुरूवातीलाच शाळेत शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याबरोबर शाळेत जाण्याविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतील व यातूनच विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपले स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी आज तुळस गावातील शिक्षणप्रेमी महिला आणि पालकांनी तुळस गावातील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.

  यावेळी तुळस माजी सरपंच भाग्यलक्ष्मी घारे, गौरी तुळसकर, भक्ती आरोंदेकर आदी महिला उपस्थित होत्या.

फोटोओळी – शिक्षक भरतीबाबत गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.

You cannot copy content of this page