जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आयोजन
ओरोस ता.०७-:
शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे यांसह सर्व शरीराच्या इतर आजारांवर सायकल ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मुख्य लोक अभिरक्षक वकील डि के गावकर यांनी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅली कार्यक्रमात बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे मार्फत कॉमन मिनिमम कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय सायकल दिवस ३ जून रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी साडे सहा वाजता जिल्हा सत्र न्यायालय ते शासकीय कर्मचारी वसाहत असे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीमध्ये डॉ बापू परब व त्यांच्या 25 मुलांनी सहभाग घेतला होता. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा सिंधुदुर्गनगरी यांच्या कडून मुलांच्या सुरक्षेसाठी वाहतूक यंत्रणा उपस्थित ठेवून सहकार्य करण्यात आले. रॅलीची सुरुवात वकील डी के गावकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.
