पावसाळ्यापूर्वी वीज वितरण दुरुस्तीची कामे पूर्ण करा

वीज वितरणला राष्ट्रवादीच्या नंदकुमार घाटे यांचे निवेदन

⚡देवगड ता.०६-: देवगड जामसंडे शहरासह तालुक्यातील पावसाळी हंगामात वीजप्रवाह खंडित होणार नाही .यासाठी आवश्यक ती दुरुस्ती उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी.दि.२९ मे रोजी दुरुस्ती करीता वीजप्रवाह दिवसभर खंडित करण्यात आला होता.

परंतु काही भागातील वीज रात्री दीड वाजेपर्यंत सुरळीत झाली नव्हती अशी परिस्थिती ऐन पावसाळ्यात येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.त्यादृष्टीने महावितरण ने सकारात्मक राहून जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी लेखी पत्राद्वारे मराविवी कंपनी उपविभागीय अधिकारी श्री शेख यांचेकडे केली आहे.

You cannot copy content of this page