आदित्य ठाकरेंच्या वाढदिनी युवासेनेचे विविध उपक्रम

वृक्षारोपण, फळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन;गणेश गावकर, फरीद काझी यांची माहिती

⚡देवगड ता.०६-: शिवसेना युवासेना नेते आम.आदित्य ठाकरे यांच्या १३ जून वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अधिकारी सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका युवा सेनेच्या वतीने दि.१३ जून रोजी देवगड ग्रामीण रुग्णालयात फळवाटप,वृक्षारोपण ,दि.१४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड तालुका युवासेना अधिकारी गणेश गावकर ,फरीद काझी यांनी दिली.

या प्रसंगी युवासेना उपजिल्हा अधिकारी निनाद देशपांडे,तालुका प्रमुख मिलिंद साटम,जयेश नर उपस्थित होते.

You cannot copy content of this page