Headlines

Global Maharashtra Breaking News

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 25 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 25 जून 2023 रोजी दुपारी 2.15 वाजता दाबोलिम विमानतळ, गोवा येथे आगमन. दुपारी 2.25 वाजता दाबोलिम विमातळ, गोवा येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह,…

Read More

अखेर मळगाव हायस्कूल समोर गतिरोधक…

मनसेने वेधले होते लक्ष; बांधकामाचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूलच्या समोर गतिरोधक घातले नसल्याकारणाने हायस्कूलचे समोर अपघाताचे प्रमाण वाढले होते बऱ्याच जणांनी गतिरोधक घालण्याच्या या मागणीला जोर धरला होता ही बाब मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ, राकेश परब व कार्यकर्त्यांच्या गावातल्या लोकांनी आणि शिक्षक वर्गाने निदर्शनास आणून दिले त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी…

Read More

पावसाच्या आगमानाने सर्वत्र समाधानाचे चित्र

⚡वेंगुर्ला ता.२४-: बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने आज शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Read More

वायरी गर्देरोड येथील मितेश वराडकर या तरुणाचे निधन

⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी गर्देरोड येथील रहिवासी मितेश रमेश वराडकर (वय २८) याचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे ४ वाजता मुंबई येथे निधन झाले. मितेश याच्या अकाली जाण्याने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. मितेश याचा मोठा मित्रपरीवार होता. एक चांगला क्रिकेटर तसेच सर्वांमध्ये मनमिळाऊ स्वभावामुळे तो परिचित होता. आज शनिवारी वायरी येथील मोरयाचा धोंडा येथील स्मशान…

Read More

साने गुरुजी कथामाला मालवण कथा महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर…

मावळ्यांच्या कथा, गुरु-शिष्य कथा, महिला वैज्ञानिक कथा या विषयांचा समावेश.. ⚡मालवण ता.२४-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे आयोजित कथा महोत्सव स्पर्धेचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून शाळास्तर, वर्ग स्तर स्पर्धा ५ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तर अंतिम स्पर्धा *रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी…

Read More

श्री कलेश्वर विद्या मंदिर मधील मुलांना वह्या व छत्र्यांचे वाटप…

सरपंच गुणाजी गावडे यांचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२४-: श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळेत ग्रामपंचायत कार्यालय वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना वह्या व छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला.यावेळी श्रीम शितल खांबल उपसरपंच श्री महेश गावडे सदस्य श्री भगवान गावडे सदस्य श्री परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष श्री शरद जाधव श्री संतोश…

Read More

आचरा मार्गावरील बिडवाडी फाटा येथे रस्त्यावर झाड कोसळले

वाहतूक पर्यायीमार्गे वळविली; पहिल्याच पावसाचा फटका ⚡कणकवली ता.२४-: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून कणकवली आचरा मार्गावरील बिडवाडी फाटा येथे सकाळी 11. 45 वा. आचरा रस्त्यांवर व बिडवाडी फाट्यानजिक रस्त्यावर झाड कोसळल्याने आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच वरवडे मार्गाने वळवावी लागली आहे. काल पासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.मात्र…

Read More

2017 पूर्वी अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असलेल्या शिक्षकाना वेतन वाढ व फरक मिळावा

शिक्षक भारतीची मागणी ⚡ओरोस ता २४-: सिंधुदुर्ग जिल्हयातील 2007 ते 2016 म्हणजे 2017 पूर्वीपर्यत अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणारे अनेक शिक्षक आहेत. मात्र या कालावधीतील शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भाने  जिल्हा परिषद सिंधुदुर्गने कार्यवाही केलेली नाही. असे शिक्षक अत्यृउत्कृष्ट  आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. तरी त्यांना आगाऊ वेतनवाढी लागू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष…

Read More

सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रांताधिकाऱ्यानी केले कौतुक

चालू पावसाळ्यासाठीही नागरिक सुरक्षेसाठी टीम सज्ज ⚡सावंतवाडी ता.२४-: दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सावंतवाडीच्या सुरक्षितसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे या टिमच्या माध्यमातून शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती द्वारे उगवणाऱ्या परिस्थितीवर मात करून तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचे विनामूल्य सेवाभावी कार्य या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक प्रांताधिकारी पनवेकर यांनी केले आहे…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

सावंतवाडी ता.२४-; गांजा हा अंमली पदार्थ बेकादेशीर रित्या स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी प्रविण श्रीरंग पवार रा. काजरावाडी, तेर्सेबांबार्डे, कुडाळ याची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एस. डी. चव्हाण यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read More
You cannot copy content of this page