राजन तेली ; एमआयडीसी बाबत दीपक केसरकर यांची भूमिका चुकीची
सावंतवाडी
स्थानिक आमदार दीपक केसरकर मोठा उद्योजक आणणार म्हणून आडाळी एमआयडीसी बाबत निर्णय न घेणे कितपत योग्य आहे ज्या अपेक्षेने जनतेने आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या अपेक्षा लक्षात घेता येत्या पंधरा दिवसात एमआयडीसीमध्ये प्लॉट वाटत नाही झाल्यास सत्तेत असलो तरी याबाबत आवाज उठवावा लागेल असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिला.
दरम्यान गेली नऊ वर्ष एमआयडीसीमध्ये एकही वीट न रचणे दुर्दैव असून नजीकचे मोपा विमानतळ लक्षात घेता मुंबई गोवा येथील उद्योजकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना या ठिकाणी उद्योग उभारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे परंतु स्थानिक आमदार दीपक केसरकर यांची भूमिका ही चुकीची असल्याचा आरोपही श्री तेली यांनी केला.
