Headlines

सत्तेत असूनही मंत्री दीपक केसरकर घरासमोरील एसटी स्थानक सुस्थितीत आणू शकत नाही हे दुर्दैव…

राजन तेली ; गाजावाजा करून स्थानिकांना केवळ स्वप्ने दाखवली..

⚡सावंतवाडी ता.०७-: स्थानिक आमदार सत्तेत मंत्री असून देखील स्वतःच्या घराच्या समोर असलेले सावंतवाडी एसटी स्थानक सुस्थितीत आणू शकत नाहीत यासारखे दुर्दैव नाही. गेली अनेक वर्षे केवळ गाजावाजा करून स्थानिक लोकांना मोठी स्वप्न दाखविण्याचं काम ते करीत आहेत. मात्र प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन या विरोधातही आम्हाला भविष्यात आक्रमक व्हावं लागेल असा इशाराही माजी आमदार राजन तेली यांनी यावेळी दिला.
याबाबत बुध कमिटी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लवकरच भूमिका मांडणार असल्याचेही तेली यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील रस्ते गाडी धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच अन्य काही काम बाकी आहे. या स्थानकावर लांबल्यांच्या गाड्यांना थांबा मिळणे देखील आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न देखील लवकरच सोडविण्यात येईल असे सांगतानाच वंदे भारत संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सावंतवाडीकरांना लवकरच गोड बातमी मिळेल असा विश्वासही राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page