‘उमेद’च्या अधिकाऱ्यांकडून बचत गटांचा उपयोग राजकारणासाठी

कारवाईची मागणी: झरेबांबरमधील आजी माजी सरपंचांचा इशारा

⚡दोडामार्ग,ता.०७-: तालुक्यात उमेद अभियानांतर्गत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी नेमलेले अधिकारी केवळ शासनाला दाखवण्यासाठी काम करत आहेत.शिवाय त्यांच्याकडून उमेदशी संबंधित बचतगटातील महिलांचा वापरही केवळ राजकारणासाठी,राजकीय लोकांच्या सभा संमेलनाला गर्दी जमवण्यासाठी केला जात आहे. उमेद अभियानाचा मूळ उद्देश महिलांचा आर्थिक, सामाजिक, भावनिक, शैक्षणिक व नेतृत्व विषयक विकास करणे हा आहे;मात्र काही अधिकाऱ्यांकडून मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

उमेद अभियानाचे प्रभारी तालुका अभियान व्यवस्थापक गावागावात महिलांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत असे आरोप करत त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी झरेबांबर सरपंच अनिल शेटकर,माजी सरपंच स्नेहा गवस, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, बचत गटाच्या अध्यक्ष समृद्धी गवस यांनी पत्रकार परिषदेत केली .तसेच त्या अधिकाऱ्याविरोधात महिलांना घेऊन मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
झरेबांबर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद आयोजिण्यात आली होती.

You cannot copy content of this page